कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील जय भारत शिक्षण संस्थेच्या डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाच्या इमारतीचे महापालिकेच्या इंजिनिअर मार्फत स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे. या अहवालामध्ये सदर इमारत योग्य सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या इमारतीमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी मिळावी. अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष पी. एस. पाटील, उपाध्यक्षा सुमित्रा जाधव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केली.

यावेळी जय भारत शिक्षण संस्थेमार्फत रुईकर काँलनी येथे गेल्या ४० वर्षांपासून डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर आणि हायस्कूल सुरू आहे. यामध्ये प्राथमिकचा ५०० तर हायस्कूलचा ३०० पट आहे. या संस्थेने महापालिकेच्या इंजिनिअरकडून २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. यामध्ये ही इमारत सुस्थितीत असून पूर्ववत वापरण्यास योग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. तरीदेखील मुख्याध्यापक मनमानी कारभार करत संस्थेला व विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत.

तर मुख्याध्यापक शाळेची व संस्थेची काही संघटनाना घेवून बदनामी करत आहेत असा आरोप ही यावेळी संस्था पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर नवीन स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास ही संस्था तयार असून त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व शाळा वाचवण्यासाठी शाळा सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कायदेशीर सल्लागार अँड. प्रशांत पाटील उपस्थित होते.