डॉ. सर्जेराव पद्माकर यांची ‘शिविम’च्या कार्यकारिणीवर निवड

0
118

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेठवडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सर्जेराव पद्माकर यांची शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली. ‘शिविम’ ही संघटना मराठी विषयाच्या प्राध्यापकांची राज्य पातळीवर काम करणारी अत्यंत प्रभावी अशी संघटना आहे. तासगाव (जि.सांगली) येथे नुकत्याच झालेल्या दहाव्या अधिवेशनामध्ये एकमताने डॉ. पद्माकर यांची ही निवड करण्यात आली.

प्रा. पद्माकर गेली १२ वर्षे अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांनी दोन ग्रंथांचे संपादन केले असून अनेक राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. दोन संघटनांचा आदर्श शिक्षक पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे. शिवाजी विद्यापीठाचे पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल प्र.प्राचार्य, जे. सी. घाडगे, डॉ. विवेक खरे, डॉ. सुनील पवार, डॉ. बळवंत मगदूम, प्रशांत चव्हाण यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.