कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील वनौषधी विद्यापीठाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार आणि आयुर्वेद एक्सलन्स गोल्ड मेडल अवॉर्ड सोहळा संपन्न झाला. यंदा हा पुरस्कार डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सध्या संपूर्ण जगभरात आयुर्वेदाचा स्विकार केला जात आहे. आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज बनली आहे. हे काम कोल्हापुरातील वनौषधी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील पाटील अविरतपणे करत आहेत. आयुर्वेदिक क्षेत्रात नवनवीन संशोधन करण्यासाठी कोल्हापुरात एखादे आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू करावे. त्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप आणि शासकीय पातळीवर नक्कीच मदत केली जाईल, असा विश्वास यावेळी दिला. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.

यावेळी, डॉ सुनील पाटील, डॉ. प्रणव पाटील, ऋषिकेश जाधव, अशोक वाली, अरुण मोराळे आदी उपस्थित होते.