प्रा. डॉ. राजेंद्र रायकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाच्या सदस्यपदी निवड

0
110

कसबा बावडा (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजचे क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र रायकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी व्यवस्थापन परिषदेचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली.

या निवडीसाठी डॉ.डी. वाय.पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. तर शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय जाधव, शिवाजी विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. बाबासो उलपे यांचे सहकार्य लाभले.