हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी ‘जनसुराज्य’चे डॉ. प्रदीप पाटील बिनविरोध

0
567

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी ‘जनसुराज्य’च्या डॉ. प्रदीप पाटील बिनविरोध निवड करण्यात आली. महेश पाटील यांनी मागील महिन्यात सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदी टोप येथील डॉ. प्रदीप पाटील यांची निवड झाली.

पाटील यांच्या निवडीने टोप गावास १९९८ नंतर पहिल्यांदाच २३ वर्षांनी सभापतीपद मिळण्याचा मान मिळाला. यामुळे टोपमधील शेकडो कार्यकर्ते आज हातकणंगले पंचायत समितीमध्ये दाखल झाले होते. पाटील यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचप्रमाणे टोप गावातून मोटारसायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.