देवमाणूस मालिकेतील डॉ. अजितकुमार देवचे बिंग फुटणार..?

0
162

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावात आलेली मंजुळाची अजितला भुरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही. मंजुळाने वारंवार अपमान केल्याने पेटून उठलेला अजित तिच्या घरात घुसून तिने लपवलेलं रहस्य शोधायचं ठरवतो. मंजुळाच्या घरात घुसण्यात त्याला यश मिळतं पण त्याचवेळी मंजुळा घरात येते आणि अजितला खेचून दाराबाहेर आणते आणि सगळ्या गावासमोर त्याचा पाणउतारा करते.

गावात देवमाणूस म्हणून प्रतिमा असलेल्या अजितचा गावासमोरच अपमान होणार. अजित ही बाजी उलटवू शकेल की गावकऱ्यांच्या मनातली त्याची देवमाणूस ही प्रतिमा पुसून टाकली जाईल? हा रंजक एपिसोड पाहायला विसरु नका येत्या मंगळवारी १ तारखेला.

‘झी’ मराठीवरील देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथानकामुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणित मालिकेत उत्कंठा वाढत आहे. येत्या काळातही मंजुळा आणि डॉ. अजितकुमार देव यांच्यातली चुरस अधिकाधिक रंगत जाणार आहे.