डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ४० विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड…

0
176

कसबा बावडा (प्रतिनिधी) :  कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकने दरवर्षीप्रमाणे यंदाही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा कायम राखली आहे. मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर विभागात अंतिम वर्षामध्ये शिकणाऱ्या ४० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड पुणे, कमिन्स इंडिया पुणे, विप्रो, इन्फोसिस, कौनफ सिलिंग सोल्युशन्स लिमिटेड पुणे, अंफेनोल इंडिया प्राइवेट लिमिटेड पुणे, एस्सेल प्रो-पैक लिमिटेड गोवा, डीसीएक्स  सोलुशन्स पुणे या नामांकित कंपनीमध्ये वार्षिक दीड ते अडीच लाख पॅकेजवर निवड झाली आहे.या कंपन्यांच्या मुलाखती ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना असणारे तांत्रिक ज्ञान, संभाषण कौशल्य, सादरीकरण कौशल्य या आधारे त्यांची निवड करण्यात आली. अंतिम वर्षात शिकत असतानाच विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याबरोबर मुलाखतीमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्व कौशल्ये त्यांच्या अंगी यावीत यासाठी तयारी करून घेतली जाते. त्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.

या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष ना. सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले. तर प्राचार्य डॉ. महादेव नरके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. नितीन माळी, प्रा. मिनाक्षी पाटील, प्रा. महेश रेनके, प्रा. अक्षय करपे, प्रा. बी. जी. शिंदे, प्रा. सचिन जडगे, प्रा. धैर्यशील नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.