कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहीका कस्तुरी सावेकर ही सध्या एव्हरेस्ट शिखर मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. या मोहीमेसाठी येणारा खर्च लक्षात घेता  डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने अध्यक्ष डॉ. संजय पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतूराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

कस्तुरी सावेकर ही सध्या माऊंट एव्हरेस्ट मोहीमेच्या अंतीम टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी अंदाजे ४२ लाख रुपयांचा खर्च असून, ही मोहीम पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन सावेकर कुटूंबियांकडून करण्यात आलं होतं. कस्तुरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्हा माऊंटेनरींग असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. विश्वनाथ भोसले, जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.