कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन केले.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा आणि ते हयातीत असताना कोल्हापुरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल यांनी १९५० साली उभारला. याच बिंदू चौकात आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका चांगल्या वसतिगृहाची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच येत्या दोन वर्षांत याठिकाणी लवकरच भव्य बौद्धविहार बांधण्याचा मानस आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे दीपक गौड, तुकाराम साळोखे, राजू ढाले, सुधाकर भांदीगरे, कमलाकर किलकीले, निलेश हंकारे, सुशील भांदीगरे, श्रीकांत मंडलिक, बंटी साळोखे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.