भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणे : काँग्रेस मंत्र्यांचा गौप्यस्फोट    

0
37

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्याकडेही भाजप नेत्यांची महिलांसोबतची  डझनभर प्रकरणे आहेत, असा दावा करून  मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की,  संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजपा नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात नाव समोर आल्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, शिवसेनेकडून याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. यावरून वडेट्टीवार यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.