मुंबई (प्रतिनिधी) : वाढीव वीज बिलाविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. मुंबईतील मोर्चावेळी ‘वीज बिल भरु नका’, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकाने वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आले तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा, आणि मग परिणाम पहा, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे म्हणाले, सरकारला आर्जवांची भाषा समजत नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. आता मोर्चाच्या भाषेत समजावण्याची वेळ आली आहे. प्रचंड वीज बिलांद्वारे सरकारने जनतेला शॉक दिला आहे. सरकारने वीज बिलांमधून ‘जिझिया कर’ लावला आहे.