बुलढाणा (वृत्तसंस्था) : देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, असे म्हणत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीची क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना धारेवर धरले. उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या चिखली येथील सभेत ते बोलत होते.

आज डीपी जळतायत, किती लोक तुमच्याकडे मदतीला येत आहेत. डीपी जळल्यानंतर पटकन तुम्हाला रिपेअर करून मिळतोय का?, वीज बिलाची वसुली थांबलेली आहे का चालू आहे, असे सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.

तेव्हा काय बोलत होते, मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, याठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे. त्या ठिकाणी मध्यप्रदेशमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये वीज बिल भरलेले आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडतो की त्या ठिकाणी आवाज जाईल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

या ठिकाणी आणि त्या ठिकाणी करताय ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. वीजबिल माफ करा, शेतकऱ्यांच्या बिलाचे साठलेले पैसे तुम्ही द्या आणि शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करा. चला या ठिकाणी आणि त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. वरती बसल्यावर वेगळी भाषा आणि खाली उतरल्यावर वेगळी भाषा, जी कर्जमुक्ती आम्ही केली होती, तिचा लाभ यांना मिळाला की नाही ते विचारा. जी कर्जमाफी तुम्ही केली होती, त्या अटी किती होत्या. कर्जमाफ किती लोकांचे झाले हेसुद्धा विचारा, माझे जाहीर आव्हान आहे. पश्चिम विदर्भाचा भाग राहिला होता, कारण जेव्हा आपण कर्जमाफी आणि कर्जमुक्ती जाहीर केली, तेव्हा ती योजना ३१ मेपर्यंत पूर्ण करायची होती. दुर्दैवाणे कोरोनाचे संकट आले आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली. पण आपण स्वतः सरकारने गॅरंटी दिली आणि त्यांचे कर्जसुद्धा माफ करायला लावले होते, असेही ठाकरे म्हणाले.