डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराचे वासे फिरले : आता बायकोही साथ सोडणार..?

0
35
US President Donald Trump and First Lady Melania Trump walk across the South Lawn upon return to the White House in Washington, DC on May 27, 2020. - SpaceX's landmark launch to the International Space Station -- the first crewed mission to blast off from US soil in almost a decade -- was scrubbed today due to bad weather. (Photo by Olivier DOULIERY / AFP)

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या अटीतटी आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत जो बायडेन यांनी दणदणीत विजय संपादन केला. हा पराभव माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होताना डोनाल्ड ट्रम्प यांना कौटुंबिक पातळीवर दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.   

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मलेनिया ट्रम्प त्यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘डेल मेल’ या वृत्तपत्राने दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मलेनिया ट्रम्प यांच्यातील १५ वर्षापूर्वी सुरु झालेले नाते संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये राहत आहेत, असेही डेल मेलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे त्यांनी म्हटले आहे.