मुंबई  (प्रतिनिधी) : मोस्ट वाँन्टेड कुविख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलिपिन्समध्ये १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती फिलिपिन्सने भारत सरकार  दिली.  आता  त्याला भारतात आणण्यासाठी मुंबई पोलीस  आणि सीबीआयने   पुढील प्रक्रिया सुरु  केली आहे.  मुंबईत सुरेश पुजारीवर  एकूण ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १६ गुन्हे खंडणीचे आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारी  याने १० वर्षांपूर्वी रवी पुजारीपासून फारकत घेत आपला सवता सुभा मांडत स्वत:ची टोळी तयार केली  होती. नवी मुंबई,  मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांकडून तो खंडणी  उकळत होता. २०१८ मध्ये त्यांने कल्याण-भिवंडी महामार्गावरील  के. एन. पार्क हॉटेलवर  गोळीबार केला होता.  दिग्दर्शक महेश भट यांच्या कार्यालयाबाहेरही त्यांने गोळीबार केला होता. २००७ मध्ये सुरेश पुजारीने भारताबाहेर पलायन केले होते. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.