डोंबिवली हादरली : ३० जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
38

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अमानुष अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असताना डोंबिवलीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.  याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या भोपर परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला.