‘दारू पिउन गाडी चालवतोस का ?’ : महेश मांजरेकरची एकाला मारहाण

0
94

पुणे (प्रतिनिधी) : पुणे- सोलापूर महामार्गावर गाडीला धडक दिल्याने एकाला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी टेंभुर्णीतील कैलास सातपुते यांनी तक्रार केली. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.  ही घटना  शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

महामार्गावर समोरच्या वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारे वाहन महेश मांजरेकर यांच्या गाडीवर येऊन धडकले. त्यानंतर त्यांनी गाडीतून उतरून ‘तू दारू पिउन गाडी चालवतोस का’ असे म्हणत वाहन चालकाच्या कानशिलात  लगावून नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी सातपुते आणि मांजरेकर यांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र पोलीस ठाण्यात  चल, असे म्हटल्यावर मांजरेकर यांनी तेथून पळ काढला.