डीकेटीई संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सीए फाऊंडेशन परिक्षेत यश…

0
42

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी निधी ललवानीने सीए फाउंडेशन परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. तर याच शाळेतील लखन रांदर आणि खुशी पारख हे दोन विद्यार्थी देशातील पहिल्या ५० मध्ये गुणवत्तेत आले आहेत.

निधी ललवानीने डीकेटीई संस्थेमध्ये इयत्ता पहिली पासून शिक्षण घेत आहे. अकरावी व बारावीच्या अभ्यासासह फाउंडेशन कोर्स तिने याच कॉलेजमध्ये पूर्ण केला. नोव्हेंबर २०२० मध्ये देशपातळीवर सीए फाउंडेशनसाठी परीक्षा झाल्या होत्या. याचा निकाल नुकताच जाहीर झाला. ४०० पैकी ३६१ गुण मिळवून निधी देशात अव्वल राहिली आहे.

निधी बरोबरच देशातील पहिल्या पन्नास जणांच्या गुणवत्ता यादीत याच महाविद्यालयातील लखन रांदड व खुशी पारख यांचाही समावेश आहे. यापूर्वीही या परीक्षेत डीकेटी संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजने आपला दबदबा कायम ठेवला आहे. लखन हा अकाउंट्स विषयात १०० पैकी ९६ गुण मिळवून प्रथम आला आहे. कॉलेजच्या सीए फाउंडेशन अकादमीच्या एकूण २४ विद्यार्थ्यानी या परीक्षेत यश मिळविले आहे.

संस्थेचे प्राचार्य माला सूद यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. व्ही. बी. चौगुले, प्रा. एस.डी. पाटील, प्रा. जी एस.अग्निहोत्री, प्रा. ए.एच.सावंत, पुरण यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव सपना आवाडे यांनी या यशाबद्दल सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.