कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखऱ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि ७.६७ टक्के सानुग्रह अनुदान दिपावलीची भेट म्हणून देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (शनिवार) कसबा बावडा येथे कारखानास्थळी केली.

कारखान्याने नेहमीच सातत्याने शेतकरी, सभासदांबरोबरच कामगार हिताचाही विचार केला आहे. तसेच त्रिपक्षीय वेतन कराराप्रमाणे जाहीर होणारी १२ टक्के वेतनवाढ शासकीय आदेशानंतर मागील फरकासह कामगारांना देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावतीने यावेळी महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, संचालक अमल महाडिक, हरिष चौगले, आनंदा तोडकर, सिद्धू नरबाळ, प्रशांत तेलवेकर, पंडीत पाटील, दिलीप उलपे, राजाराम मोरे, कुंडलिक चरापले, केशव कांबळे, पांडुरंग पाटील, बिरदेव तानगे, संचालिका कल्पना पाटील, तज्ज्ञ संचालक नेमगोंडा पाटील, शिवाजी घोरपडे, शंकर कदम, मानद तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेढे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.