कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराजस्व अभियानांतर्गत इचलकरंजी येथील नगरपालिका हद्दीतील चुकून लागलेले ‘ब’ सत्ताप्रकार कमी करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिले. एकूण ४० सिटी सर्व्हे सर्वेक्षण, टिपी स्किमवरील ११४ मिळकत धारकांना ही दिवाळीची भेट मिळाली आहे.

इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील काही सिटी सर्व्हेच्या मिळकतीवर ‘ब’ सत्ता प्रकार लागला आहे. ब सत्ता प्रकार कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २० फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. त्यांनी ‘ब’ सत्ता प्रकार कमी करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी ११४ मिळकतीवरील ब सत्ता प्रकार कमी केला. या आदेशामुळे मिळकत धारकांना खरेदी-विक्री करताना अथवा कर्ज काढताना आता नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.