डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0
93

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मुंबई येथे राज्य पातळीवरील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेची कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय पोवार, उपाध्यक्षपदी ताज मुल्लाणी, कोल्हापूर शहराध्यक्षपदी प्रशांत चुयेकर, कोल्हापूर शहर सचिवपदी मदन अहिरे, कोषाध्यक्षपदी उत्तम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह पदाधिकार्‍यांच्या निवडीची पत्रे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे यांनी प्रदान केली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये सहसचिव समाधान म्हातुगडे, सदस्य अस्लम शानेदिवाण, अनुराधा सरनाईक-कदम, चेतन शेरेगार, साक्षी दळवी यांची निवड करण्यात आली आहे.