रुकडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन…

0
43

हातकणंगले (प्रतिनिधी) : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या म. गांधी विद्यालयाच्या वसतिगृहात ग्रामपंचायत रुकडी व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते उद्घाटन या सेंटरचे उद्घाटन झाले.

रुकडी, अतिग्रे, माले, मुडशिंगी, माणगाव, हेरले, चोकाक या गावांतील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. माजी खासदार निवेदिता माने यांनी या कविड सेंटरला मदत करावी असे आवाहन उपस्थितांना केले. जिल्हाधिकारी देसाई यांनी शासन पातळीवरून सर्व सहकार्य करण्याची हमी दिली. हेरले प्रा. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. देशमुख व अन्य तीन डॉक्टरांच्या सहकार्याने कोविड रुग्णांवर उपचार होणार आहेत.

या वेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, जि. प. सदस्य अशोकराव माने, सरपंच रफिक कलावंत यांची आणि नागरिक उपस्थित होते.