कोल्हापुरातील लोक चळवळीचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात जनजागृती करण्यासाठी शहरात ‘अँटी स्पिट मूव्हमेंट’ ही चळवळ कार्यरत आहे. या चळवळीतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले. मागील चार महिन्यात राबवलेल्या जनजागृती मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, देशात प्रथमच कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी अशी लोक चळवळ चालू आहे. या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रश्न हाताळला जातोय हे विशेष आहे. तसेच यावेळी जनजागृती बरोबरच शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे थुंकीमुक्त क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्हा प्रशासन या चळवळीच्या पाठीशी असेल. तसेच शालेय स्तरावर मुलांच्यात हा विषय आधीपासूनच रुजवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण विभागाला यासंबंधी सूचना दिली जाईल.

यावेळी दिपा शिपुरकर, राहुल राजशेखर, आनंद आगळगांवकर, प्रसाद नरुले, सागर बकरे, राहुल चौधरी व ‘अँटी स्पिट मूव्हमेंट’ चळवळीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.