भाटणवाडी येथे वडीलांच्या उत्तरकार्यादिवशी केले वृक्षांचे वाटप

0
35

सावरवाडी (प्रतिनिधी) : पर्यावरण संतुलन आणि वृक्षांचे महत्त्व नव्या पिढीत रुजावे या भावनेतून कोरोनाच्या काळात करवीर तालुक्यातील भाटणवाडी गावात वडीलांच्या उत्तरकार्यादिवशीच वडीलांची आठवण रहावी म्हणून वृक्षाचे वाटप  करण्यात आले.

गावातील  पांडुरंग महादेव पाटील यांचे नुकतेच वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. वडीलांच्या उत्तरकार्यादिवशीच त्यांच्या स्मरणार्थ झाडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. सुभाष पांडुरंग पाटील, कृष्णात पांडुरंग पाटील, जयसिंग पांडुरंग पाटील आणि साजन पांडुरंग पाटील या चार मुलांनी वडीलांच्या उत्तरकार्याच्या इतर खर्चाला फाटा देत वृक्षांचे वाटप करण्याचा एक सामाजिक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण समाजात वेगळ पायंडा पाडला गेला. यावेळी राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, रंगराव पाटील, तानाजी गुरव, संजय पाटील आदी  उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here