दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गावातील गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. एन. मगदूम होत्या. प्रमुख पाहुण्या सरपंच दीपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील, पोलीस पाटील सविता गुरव, गावातील सर्व संस्था, सोसायटी, दूध संस्था यांचे पदाधिकारी, सदस्य व युवक-युवती उपस्थित होते. डिसेंबर २०२१ मध्ये उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करण्यात आली आहे.

सर्व घटकातील दुर्लक्षित घटकांना सहाय्य करून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणे, युवक-युवती, लहान मुले, महिला यांचा मानसिक, बौद्धिक विकास करणारे कार्यक्रम राबवणे, अनाथांना, दिव्यांगाना आधार देऊन जगण्याची नवी प्रेरणा देणे, पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवणे हा उद्देश सफल करण्याबरोबरच युवा दिनानिमित्त शालेयस्तरावर निबंध, वक्तृत्व स्पर्धा, असे विविध उपक्रम उर्मी सेवाभावी संस्थेतर्फे राबविण्यात येत आहेत.

यावेळी अमित हुजरे, सुमित हुजरे, एस. डी. पाटील, बबलू पाटील, सर्जेराव हराळे, दिलीप हुजरे, सागर हुजरे, संदीप हुजरे, संदीप भगवान हुजरे, सुरेश हुजरे, अमर राऊत, धनाजी हुजरे, प्राजक्ता हुजरे आणि गर्ल्स हायस्कूल खुपिरेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.