धनगरवाड्यांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0
39

मुरगूड (प्रतिनिधी) : उमा शंकर सेवा ट्रस्ट व रंकाळा पदपथ मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने राधानगरी तालुक्यातील मधला धनगरवाडा येथील दहावी व बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

बाजारी धनगरवाडा येथील शिक्षणासाठी पायी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसापासून सुरक्षा म्हणून रेनकोट देण्यात आले. स्थानिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवकांनी विद्यार्थ्यांसोबत बालपणीच्या खेळांचा ठेकादेखील धरला.

हुंबेवाडा या धनगरवाड्यावर गाडी जात नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन वह्यांचे वाटप केले. उमा-शंकर सेवा ट्रस्टचे संस्थापक विनायक कुलकर्णी, रंकाळा पदपथ ग्रुपचे सदस्य योगेश जोशी, किरण जोशी, अरुण कुलकर्णी, वाठारकर, अमर पारगावकर, छाया जोशी, अर्चना कुलकर्णी, रामचंद्र देवणे (यशवंत क्रांती संघटना) राधानगरी तालुका संपर्कप्रमुख व शिक्षक सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.