वेतवडे येथे विद्यार्थिनींना शालेय साहित्यांचे वाटप

0
39

कळे (प्रतिनिधी) :  नांदी फाऊंडेशन ‘नन्ही कली प्रकल्प अंतर्गत’ पन्हाळा तालुक्यातील वेतवडे प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील ५७ विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  मुलींचा बौध्दिक विकासासह सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता नन्ही कली अंतर्गत हा उपक्रम  राबविण्यात येत आहे.

मुलींना टॅब बॅग, स्वेटर, चित्रकला वहया, रंगपेटी, वहया, पेन, पेन्सिल आदी साहित्य देण्यात आले. यावेळी सौ गुरव यांनी भविष्यात नन्ही कली अंतर्गत ग्रामीण भागातील मुलींनी स्पोर्ट्समध्ये पुढे जाण्यासाठी ‘तुफान गेम्स’ ही नवी योजना येत असून त्याद्वारे मुलींना नॅशनल स्तरापर्यंत स्वखर्चातून मदत केली जाणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास नन्ही कली पन्हाळा तालुका कोऑर्डिनेटर  माधुरी गुरव,  सरपंच सुनिता दळवी,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक सुतार,  प्रकल्प शिक्षिका अरुणा पोवार,  संपदा वीर,  ग्रा.पं. सदस्य रुक्मिणी पाटील,  शिवाजी पाटील,  सुहास कांबळे, के. डी. पाटील,  पोलीस पाटील नामदेव पाटील आदीसह पालक उपस्थित होते. अरुणा पोवार यांनी  आभार मानले.