युवा हिंदू खाटीक संघटनेकडून शालेय साहित्याचे वाटप  

0
73

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : देशभरात ७२ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम राबवून  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे डॉ. कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. तसेच शाळेतील कष्टकरी व होतकरू विद्यार्थ्यांना युवा हिंदू खाटीक संघटनेकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी युवा हिंदू खाटीक संघटनेचे अमर शेटके, संजय नूलकर, हेमंत इंगवले, किरण कांबळे, गुरुप्रसाद नूलकर, दुष्यंत कांबळे, अक्षय काळगे, सोमू पोवार, श्रेयस शेटके, आशिष शेटके, खंडू कांबळे, अक्षय शेटके, सागर कांबळे, अवधूत कांबळे, गणेश कांबळे, करन कांबळे, विनायक घोडके आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.