भैरववाडीतील अंगणवाडीस शालेय साहित्य, खेळणीचे वाटप

0
53

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : भैरववाडी येथील अंगणवाडी क्रमांक ११४ व १७७ मध्ये रोटरी क्लब तसेच अभिजित ऊर्फ बबलू पवार मित्र मंडळ यांच्या वतीने बालकांना मोफत शालेय साहित्य आणि खेळणीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करुन समाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

यावेळी अभिजित ऊर्फ बबलू पवार, रोटरी क्लबचे शैलेश व्होरा, बाळासाहेब बरगाले, सुरेश चोपडे, सुभाष जाफळे, दत्तात्रय कुलकर्णी, संदीप गायकवाड, अनिकेत पाटील, शिवाजी बाबर, रघू नाईक, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.