Published October 6, 2020

कोतोली (प्रतिनिधी) : बोरगाव (ता. पन्हाळा) येथील संतोष आण्णाप्पा संकपाळ आणि दिपाली संतोष संकपाळ या दापत्यांनी आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील लहान मुलांना १५० मास्कचे वाटप केले.

संतोष संकपाळ दुसऱ्या मुलीच्या म्हणजेच वैदहीच्या पहिल्या वाढदिसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव अजूनही सुरूच आहे. यामुळे मोठ्या माणसांसह अनेक लहान मुले देखील बाधित होत आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टंट राखणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर संकपाळ दापत्यांनी सामाजिक भावनेतून मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी १५० मास्कचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023