कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने आज (शनिवार) लक्ष्मीपुरी भाजी मंडई,पंचगंगा घाट भाजी मंडईसह गंगावेश पापाची तिकटी येथील रिक्षाचालकांना मास्कचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र पोलिस कर्मचारी रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन संवेदना उपक्रमांतर्गत अनेक गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांनाही मदत करत आहेत. दरम्यान आज लक्ष्मीपुरी पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने लक्ष्मीपुरी भाजी मंडई आणि पंचगंगा घाट भाजी मंडईसह गंगावेश पापाची तिकटी येथील रिक्षाचालकांना मास्कचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

 यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर,पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.