बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अकिवाट येथे हरिपाठ पुस्तकांचे वाटप

0
90

इचलकरंजी (प्रतिनिधी) : अकिवाट (ता.शिरोळ) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त अकिवाट येथे शिवप्रेमी स्पोर्ट्सच्या वतीने हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच युवासेनेचे शिरोळ तालुका समन्वयक निलेश तवंदकर यांच्या तर्फे बालहरी  भजनी मंडळास हरिपाठ पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, युवासेना तालुका प्रमुख प्रतिक धनवडे, बाबासो सावगावे, दत्ता कामत, रजपूत, कुमार तवंदकर, बाळासो उमाजे, उत्तम लाटवडे, भाऊसो चव्हाण, श्रीराम हुजरे, संतोष गायकवाड, मनोज तवंदकर, चंदन शिंदे, आशुतोष पवार, चिदानंद तवंदकर आदीसह शिवप्रेमी स्पोर्ट्स व शिवसैनिक उपस्थित होते.