पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन वाटप

0
112

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा नेते पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सुबराव गवळी तालीम प्रॅक्टिस क्लब आणि शिवगिरी मित्र मंडळ शिवसेना शाखा खोलखंडोबा यांच्या वतीने पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते कोल्हापुरी थाळी येथे गरजूंना भोजन वाटप करण्यात आले.

यावेळी सुबराव गवळी तालमीचे कार्यकर्ते नंदू सुतार, सौरभ हारूगले, प्रतीक बदामे, आकाश पाटील, अमेय बदामे, आकाश जगताप, अभिजित पाटील, सौरभ नलवडे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश हंकारे, शिवसेना शाखाप्रमुख उदय पोतदार, शिवगिरी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उमेश रेळेकर, गणेश शिंदे, अभिजित गवळी, सागर शिंदे, विनायक गवळी आदी उपस्थित होते.