कौंतेय ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या किटचे वाटप…

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात जुलै महिन्यात आलेल्या महापूराने हाहाकार माजवला होता. यावेळी शहरातील बहुतांशी भाग पाण्याखाली गेला होता. यामध्ये लक्ष्मीपुरी परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरात सुमारे पाच फुट पाणी शिरले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आणि प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले होते. लक्ष्मीपुरी येथील कौंतेय ग्रुपने आज (शनिवार) आपली सामाजिक बांधिलकी जपत या पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले.  

यावेळी शिवसेना शहर उपप्रमुख शशी बिडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील  कोंडेकर, अमोल बुढ्ढे, नजीर थोडगे, दिपक मंडलिक, दत्तात्रय कोंडेकर, दिपक ओसवाल आणि भागातील नागरिक उपस्थित होते.