पैजारवाडी (प्रतिनिधी) ; पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथील छायाचित्रकार कृष्णात हिरवे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत पन्हाळा परिसरातील गरजू आणि गरीब व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्य घरपोच वाटप केले.   

हिरवे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवस साजरा न करता या खर्चाला फाटा देत त्यांनी परिसरातील बोरपाडळे, पैजारवाडी, जेऊर, नावली गावातील निराधार गरीब आणि दिव्यांग गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंसह पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे वाटप केले.कोल्हापुरातील कै. अमृता फाऊंडेशन यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातून हिरवे यांचे  कौतुक होत आहे.

या उपक्रमासाठी बोरपाडळे वैद्यकीय अधिकारी सोनिया कदम, सरपंच शरद जाधव, पैजारवाडी माजी सरपंच अलका हिरवे, संगीता हिरवे, सागर हिरवे, सुभाष खांडेकर, उत्तम महाडीक, भीमराव पाटील, स्वप्निल माने, संजय पाटील, कृष्णा जाधव, भगवान पाटील, स्वप्निल पोवार, सुदिप पाटील, बंडा पाटील यांचे सहकार्य लाभले.