धनश्री जाधव यांच्याकडून पूरग्रस्तांना धान्य वाटप

0
63

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात कोल्हापूर शहरातील पूरबाधित परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रापंचिक साहित्यांचे मोठे नुकसान झाल्याने जुना बुधवार तालीम परिसर आणि सिद्धार्थ नगर  (प्रभाग २८ ) येथील पूरग्रस्त लोकांना सामाजिक कार्यकर्त्या  धनश्री  जाधव यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले.  यावेळी एकूण २३५ पॅकेटचे वाटप केले.

यावेळी पुष्पा जाधव,  पल्लवी पेनकर,  सविता मोरे, ज्योती कांबळे,  जीविता क्षीरसागर,  संग्राम पाटील, सुरेश आतिग्रे,  राजू ओंकार,  मनोज डफळे,  संजय पेनकर, आदी उपस्थित होते.  तर कोल्हापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर विधानसभाचे उपाध्यक्ष  गणेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.