मुरगूडमध्ये बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
7

मुरगूड (प्रतिनिधी) : येथील श्री राम मंगल कार्यालयात राजे फाऊंडेशनमार्फत शेकडो बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या पुढाकाराने आणि राजे फाऊंडेशनमार्फत हा साहित्य वाटपाचा कार्यक्रम शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते व गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तमामा खराडे, माजी उनगराध्यक्ष बजरंग सोनुले, अमर चौगले, प्रताप पाटील, अनंत फर्नांडिस, रामभाऊ खराडे, विलास गुरव, विजय गोधडे, सदाशिव गोधडे, प्रवीण चौगले, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.