कागल (प्रतिनिधी) : कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून धनादेशांचे वितरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात झाले.

या योजनेचे लाभार्थी लता कुंडलिक कांबळे (बाचणी), साखरूबाई शिवाजी पाटील (बोळावी), वनिता प्रकाश कांबळे (चिमगाव), हौसाबाई बाळू कोकणे (नानीबाई चिखली) यांना धनादेश प्रदान करण्यात आले.

यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य सदाशिव तुकान आदी उपस्थित होते.