राशिवडेतील नामानंद महाराज दूध संस्थेकडून सभासदांना बोनस, दीपावली भेटवस्तूंचे वाटप

0
63

राशिवडे (प्रतिनिधी) : येथील श्री नामानंद महाराज सहकारी दूध संस्थेकडून उत्पादक सभासदांना बोनस आणि दीपावली भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये वर्षभर जास्तीत जास्त दूध पुरवठा करणार्‍या प्रथम तीन क्रमांकाच्या उत्पादकांना बक्षीस वितरण कार्यक्रम आणि सर्व उत्पादक सभासदांना बोनस रक्कम तसेच दीपावली भेटवस्तूंचे वाटप सरपंच कृष्णात पोवार, चेअरमन बबन धुंदरे आणि ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी म्हैस दुधास १९ टक्के व गाय दुधास शेकडा साडेसात टक्के  याप्रमाणे बोनस व रक्कम वाटण्यात आली त्याचप्रमाणे जास्त दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना २० हजारांची बक्षिसे वाटप करण्यात आली. यामध्ये म्हैस दूध विभागात दीपक मधुकर बिल्ले, रवींद्र बापू बोभाटे आणि हिंदुराव तुकाराम चौगुले यांनी व  गाय विभागांमध्ये दिलीप राजाराम कुडित्रेकर, सयाजी शिवाजी पाटील आणि दयानंद दत्तात्रय धुंदरे यांनी क्रमांक पटकावले. या वेळी बोनस आणि फरक म्हणून ६ लाख ५० हजारांचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व दूध उत्पादक आणि दूध खरेदीदारांना दीपावली भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही दिवशी उत्पादकांना जिलेबी वाटप करणारी गावातील ही एकमेव संस्था आहे. संस्थापक मोहन धुंदरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. या वेळी सरपंच कृष्णात पोवार, चेअरमन बबन धुंदरे, सर्व संचालक व दूध उत्पादक उपस्थित होते. सचिव दीपक बिल्ले यांनी आभार मानले.