सांगोला प्रतिनिधी

माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आबांच्या सूचनेनुसार अनावश्यक खर्च टाळून समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने दिपकआबांचे खंदे समर्थक व यशराजे साळुंखे- पाटील यांचे मित्र, वाकी गावचे सुपुत्र व उद्योगपती श्री.दत्तात्रय दाजी झिंजुर्टे यांच्यातर्फ कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. आण्णासाहेब घुले सरकार कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब व जी मुले शाळेला 5 ते 6 किलोमीटर वरून पायी चालत येतात अश्या गरजू मुलांना व मुलींना ११ सायकलींचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी त्यांचे मुंबईचे मित्र के. के.श्रु.इराणी,अमितसिंग तसेच दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या कन्या मुक्तदीदी,गावच्या सरपंच सौ.सुषमाताई घुले,उपसरपंच श्री.नवाज खलिफा, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.अरूणभाऊ घुले,वि. का.सो.माजी चेरअमन श्री.विजयकुमार देशमुख ,प्रशालेचे प्राचार्य श्री. शिंदे सर,वि. का.सो.चेअरमन श्री.अनिल साळुंखे,श्री.सुनिलआबा साळुंखे ,ग्रामपंचायत सदस्य सौ.मिनाक्षी सुतार,बिनू गायळी,कुलभूषण देशमुख,अनिल सुतार, प्रशालेच्या शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.खऱ्याअर्थाने नेत्याचा आदर्श कसा असावा हे आबासाहेब नेहमी आपल्या कृतीतून दाखवतात तोच आदर्श त्यांच्या समर्थकांच्या कृतीतून दिसून येतोय हे स्पष्ट होत आहे.