वेतवडे येथे मुलीच्या उत्तरकार्यादिवशी २०० रोपट्यांचे वाटप

0
66

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील वेतवडे (ता.पन्हाळा) येथील स्वप्नाली संभाजी कांबळे (वय २२) हिचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तिच्या उत्तरकार्यादिवशी वडिलांकडून दोनशे फणस जातीच्या रोपट्यांचे मोफत वाटप करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  

स्वप्नाली काही दिवसांपासून आजारी असल्याने तिला सीपीआर रूग्णालयात दाखल केले होते. पण वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळेच झाडांमुळे मिळणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि  मुलीवरील प्रेमापोटी तिच्या उत्तरकार्यादिवशी २०० रोपट्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ही रोपटी भारत नर्सरी वारनुळ येथून आणण्यात आली होती. तसेच बौद्ध धर्मानुसार काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्तरकार्य पार पाडण्यात आले. यावेळी बुध्द विचारवंत बी.एन.कांबळे यांनी बुध्दांचे विचार मांडत सहवेदना व्यक्त केली.