शिवसेनेतर्फे मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप : रविकिरण इंगवले

0
24

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना डोसचे प्रमाणपत्र (युनिव्हर्सल पास) विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी दिली.

इंगवले म्हणाले की, सध्या कोरोनावर लस उपलब्ध झालेनंतर कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होत आहोत. परंतु कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा नागरिकांना युनिव्हर्सल पास काढणे हे सक्तीचे आहे. युनिव्हर्सल पास नसेल तर परदेश असो किंवा भारतात कोणतेही राज्य असो, तेथे युनिव्हर्सल पासची मागणी प्रथम केली जाते. यामुळेच आम्ही हीच संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन नागरिकांना युनिव्हर्सल पास विनामूल्य काढून देऊन आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा करीत असल्याचे सांगितले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, शेखर पोवार, दत्तात्रय नकाते, अनिल इंगवले, सुकुमार लाड, राहूल इंगवले, सचिन कारंडे, राजाभाऊ घोरपडे, आबाजी जगदाळे, तात्या साळोखे, उमेश पाटील, विक्रम पाटील, जीवन घोरपडे, चंदन नवरखे, उदय माने आदी उपस्थित होते.