तब्बल ‘१८’ महिलांची हत्या करणाऱ्या विकृत मारेकऱ्याला अटक…

0
73

मुंबई (प्रतिनिधी) : हैदराबादमध्ये १८ महिलांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या ४५ वर्षीय सीरिअल किलरला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलांची हत्या करण्याशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता असे पोलिसांनी सांगितलं आहे. त्याला अटक केल्यानंतर नुकतीच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे.

या आरोपीने गेल्या २४ वर्षात तब्बल १८ महिलांची हत्या केली आहे. हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी दोन महिलांच्या हत्येप्रकरणी अटक केली असल्याचं जाहीर केले होते. ही संयुक्त मोहीम राबवत आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर आरोपी २१ गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झालं. यामध्ये १६ हत्या संपत्तीसाठी, संबंधित चार गुन्हे आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.

वयाच्या २१ व्या वर्षीय  या आरोपीचं लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता, असं पोलिसांनी सांगितले आहे.