Published September 23, 2020

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीत शपथपत्रात गुन्ह्याबाबत माहिती लपविल्याप्रकरणी नेसरी जि. प. मतदार संघाचे सदस्य हेमंत कोलेकर यांच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नेसरी येथील प्रकाश दळवी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार अशोक पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दाखल केली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हेमंत कोलेकर यांनी नेसरी जिल्हा परिषद मतदार संघातून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यासोबतच्या शपथपत्रात त्यांनी त्यांच्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात रेग्युलर क्रिमिनल केस नंबर 101/2012 नुसार गुन्हा दाखल असलेबाबतची माहिती सादर केली नव्हती. याबाबत प्रकाश दळवी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.  चौकशीत माहिती लपविल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईबाबत आदेश दिले.

त्यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसात कोलेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023