खंडित केलेली वीज ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जोडली (व्हिडिओ)…

0
99

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  वाढीव वीजबिल न भरल्यामुळे राजारामपुरी येथील ईस्त्री दुकानदाराचा वीजपुरवठा महावितरणने  खंडित केल्याचे समजताच तोडलेला वीज पुरवठा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन जोडला. या ईस्त्री दुकानदाराचे १५ हजार रुपयांचे वाढीव वीजबिल थकीत होते.

राज्य सरकारने वाढीव विजबीलांवर अजून निर्णय घेतला नसून, आता महावितरण ने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने ‘वीज जोडणी’ मोहीम हाती घेतली आहे. यासोबतच वीज जोडणी खंडित केल्यास महावितरण अधिकाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला. महावितरणच्या मुख्य कार्यालयात बैठकीत अधीक्षक अभियंता प्रशांत मासाळ यांची भेट घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.

यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, आदम शेख, विशाल वाठारे, महेश घोलपे, बसवराज हदीमनी, श्रीधर हिरेमठ, बाबुराव बाजारी, रमेश गावडे, प्रकाश हर्णे, कृष्णात सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.