वाघुर्डे येथे दोन कुटुंबात वाद : पाच जणांवर गुन्हा

0
396

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे येथे गणपती रामू शिर्के (वय ६२) आणि आबासाहेब पांडुरंग चौगले (वय ३२) या दोन कुटुंबात आज (गुरुवार) पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन आणि पत्नीस टोमणे मारल्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एकमेकांना शिवीगाळ करत झटापटही झाली.

या झटापटीत तिघेजण जखमी झाले. यावेळी अर्चना आबासो चौगले, आबासो पांडुरंग चौगले, सर्जेराव रामू शिर्के, गणपती रामू शिर्के, वालाबाई गणपती शिर्के हे सर्व रा. (वाघुर्डे, ता. पन्हाळा) अशा पाच जणांवर कळे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.