मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ  नेते दिल्लीत दाखल झाल्याने संघटनात्मक फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे. भाजप  प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या जागी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जा णारे जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय कुटे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार इच्छुक आहेत.  त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वरदहस्त आहे, परंतु शेलार यांच्याऐवजी फडणवीस  संजय कुटे यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते. कुटेसुद्धा दिल्लीत दाखल झाल्याने त्यांचे नांव आघाडीवर आहे. याबाबत  आमदार  कुटे यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी  प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या  चर्चा फेटाळून लावल्या. दिल्लीत पक्षांतर्गत बैठका सुरू असून प्रदेशाध्यक्ष  बदलाबाबत काहीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून वातावरण तापू लागले आहे.  या पार्श्वभूमीवर  प्रदेशाध्यक्ष पदावर कुटे यांची वर्णी लावण्यासाठी फडणवीस प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.