मुंबई (प्रतिनिधी) : काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याजागी तरूण नेत्याची निवड कऱण्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. त्यासाठी  खासदार राजीव सातव,  मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री सुनील केदार आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र व मंत्री अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. पण यावर  अद्याप निर्णय झालेला नाही.

तमिळनाडूमध्ये काँग्रेसचे पुनर्गठन करण्यात आले  आहे. तर  दक्षिणेतील केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील प्रदेशाध्यक्ष  बदलताना   पक्ष नेतृत्वापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून येथे जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. केरळातही मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या जागी दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची मागणी पक्षातून होत आहे. तर  रामचंद्रन यांना हटविले जाणार नसल्याचे  राज्याचे प्रभारी तारिक अन्वर यांनी सांगितले आहे.