इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीत बेशिस्त वाहतुकीला लवकरच शिस्त लावणार आहे. वाहतुकीचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सपोनि. पोलिस निरिक्षक विकास अडसूळ यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी सपोनि. अडसूळ म्हणाले की, शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियोजन आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना होणारे अपघात ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे या वाहनांची वेग मर्यादा निश्चित करणे, वाहनांना रिफलेक्टर बसवणे तसेच अन्य नियमांचे वाहनचालकांकडून काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या संदर्भात परिसरातील साखर कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधिंची लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.