कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये २३४.१६ दलघमी पाणीसाठा आहे. आज (गुरुवार) सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १४००, कोयना धरणातून ३४, २११ तर अलमट्टी धरणातून १,११,२७९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे असे सात बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात १०४.६१ टीएमसी तर अलमट्टी धरणात १२१.९५७ टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा (दलघमी. मध्ये) – : तुळशी – ९८.२९, वारणा – ९७४.१९, दूधगंगा – ७१९.१२, कासारी- ७८.५६, कडवी – ७१.२४,  कुंभी – ७६.८६, पाटगाव – १०५.२४, चिकोत्रा – ४३.१२, चित्री – ५३.४१, जंगमहट्टी – ३४.६५, घटप्रभा – ४४.१७, जांबरे – २३.२३, कोदे (ल. पा.) – ६.०६

बंधाऱ्यांची पाणीपातळी (फुटांमध्ये) – : राजाराम – १७.३, सुर्वे – १८.१०, रुई – ४६, इचलकरंजी – ४४, तेरवाड – ४०.६, शिरोळ – ३५, नृसिंहवाडी – ३६.६, राजापूर – २४.६