बेरकळवाडी गावाला ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट…

0
105

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावाला संचालकांनी भेट दिली. या गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी  खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे, त्यांचे संगोपन, व्यवस्थापन पाहण्यासाठी भेट दिल्याच सांगण्यात आले.

यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील हरियाणा येथून खरेदी केलेल्या म्हैशी दूध देत नाहीत, गाभण राहत नाहीत, त्यांचा भाकडकाळ जास्त आहे असे बरेच गैरसमज आहेत. या उलट बेरकळवाडी सारख्या दुर्गम गावातील दूध उत्पादकांनी संघाचे पशुसंवर्धन, वैरणविकास, पशुखाद्य व संकलन विभागाच्या मदतीने यासर्व बाबींवर मात करून हरियाणा येथून खरेदी केलेल्‍या मुऱ्हा म्हैशी आपल्या जिल्ह्यात सुद्धा यशस्वी होतात. म्हैशीचा दूध व्यवसाय हा किफायतशीर आहे, हे बेरकळवाडी च्या दूध उत्पादकांनी दाखवून दिलेले आहे. सध्या ७०० लिटर दूध संकलन असून भविष्यात ते १४०० लिटर पर्यंत वाढ करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहावे. त्‍यासाठी लागणरी सर्व मदत संघ करण्‍यासाठी तयार आहे असे मनोगत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, अभिजित तायशेटे, अजित नरके, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंजना रेडेकर, अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.